LIBRARIAN:BABAN KUMBHAR:E-Mail:kumbharbn@gmail.com
Wednesday, February 12, 2020
Friday, February 7, 2020
Monday, January 27, 2020
जे करायचे आहे, ते सर्वोत्तम करा
जे करायचे आहे, ते सर्वोत्तम करा
यजुवेंद्र महाजन यांचा युवकांना संदेशम टा वृत्तसेवा, कर्जत'आपल्या आवडीचे
क्षेत्र निवडा जे काही करायाचे आहे, ते सर्वोत्तम करा...
|
जे करायचे आहे, ते सर्वोत्तम करा
यजुवेंद्र महाजन यांचा युवकांना संदेश
म. टा. वृत्तसेवा, कर्जत
'आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा. जे काही करायाचे आहे, ते सर्वोत्तम करा.
कृती आणि उक्तीत सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते,' असे प्रतिपादन जळगावच्या दीपस्तभ
फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील
महाविद्यालय, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व आमदार रोहित पवार यांच्या
सृजन फाउंडेशन, बारामती यांच्यातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित
स्वयंसिद्ध युवक-युवती संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात महाजन बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग
कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी बारामती अॅग्रीकल्चर ट्रस्टच्या
विश्वस्त सुनंदाताई पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे
सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, सईताई पवार, शारदाबाई पवार
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मुंबईच्या मीना नाईक
दिग्दर्शित 'अभया' या एकपात्री एकांकिकेचे सादरीकरण करून स्वयंसिद्ध युवक-युवतींनी
स्त्री-पुरुष समतेचा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र फाळके यांनी
सामाजिककार्यात आत्मविश्वासाने दमदार पावले टाकीत स्वत:ला सिद्ध करावे, असा संदेश दिला.
पुणे येथील रुरल रिलेशन्सचे संस्थापक
प्रदीप लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाची सांगता झाली. 'जग सुंदर आहे, सुंदरतेचा शोध घ्या.
जाणिवा जागृत करा. जगाकडे विशाल दृष्टीकोनातून पहा. माणसातील माणूस दिसेल.
त्याच्या भावना जाणून त्याला मुख्य प्रहवात आणा. यासाठी वाचा.. बोला.. लिहा आणि
स्वत:
सिद्ध व्हा,' असा लोखंडे यांनी
दिला. पुरंदर व इंदापूरच्या महिला उद्योजक साधना निगडे व कल्पना धोत्रे यांनी
उद्योगक्षेत्रातील अनुभव कथन केले. सुनंदाताई पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार
रोहित पवार यांनी दूरध्वनीवरुन युवक-यूवतींशी संवाद साधला.
या संमेलनात दादा पाटील महाविद्यालयासह
संत गजानन महाविद्यालय खर्डा, जामखेड महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, मिरजगाव, महात्मा गांधी महाविद्यालय खेड, चंद्रभामा
महाविद्यालय कर्जत, या महाविद्यालयांतील वरिष्ठ विभागातील दोन हजार युवक-यूवतींनी सहभाग
घेतला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी करून दिला. प्रा. भास्कर मोरे, डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. भारती काळे, प्रा. रामकृष्ण काळे, प्रा. स्वप्नील
म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.
सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अनंत
सोनवणे यांनी आभार मानले. संमेलन यशस्वीतेसाठी प्रा. रोहिदास रोहकले, डॉ. राजकुमार सुरवसे, प्रा. कल्याण वटाणे
आणि एनसीसी व एनएसएस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
फोटोओळ
दादा पाटील महाविद्यालात घेण्यात
आलेल्या स्वयंसिद्ध युवक-युवती संमेलनात मार्गदर्शन करताना यजुवेंद्र महाजन. या
वेळी उपस्थित मान्यवर.
Maharashtra times Date 28/01/2020
Wednesday, December 18, 2019
Saturday, October 5, 2019
Thursday, October 3, 2019
Tuesday, October 1, 2019
Friday, June 28, 2019
Wednesday, June 26, 2019
Tuesday, June 25, 2019
Tuesday, April 9, 2019
Subscribe to:
Posts (Atom)